नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


गोंडेश्वर अर्थात गोविंदेश्वर

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

गोंडेश्वर अर्थात गोविंदेश्वर

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 9:55 pm


स्थापत्यशैलीतील उत्कृष्ट नमुना असलेले सिन्नर जवळचे गोविंदेश्वर मंदिर हे गोंडेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर बघितल्यावर सर्व प्रथम आठवतात ती खजुराहो लेणी. तसंच सुबक रेखीव नक्षीकाम ह्या मंदिरावर असले तरी गोविंदेश्वराने आपले वेगळेपण राखून ठेवले आहे हे खास.

नाशिकपासून २६ किमी अंतराव पुणे नाशिक रस्त्यावर सिन्नर हे मंदिर आहे. सिन्नरचे पुरातन नाव होते सिंदीनगर. राव सिंगुनी नावाच्या यादव राजाने हे नगर वसवले असल्यामुळे त्याचे नाव पडले सिंदीपूर. या राव सिंगुनीच्या मुलाने गोविंदरावाने हे मंदिर ख्रिस्तपूर्व १०२ मध्ये बांधले असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच या मंदिराला गोविंदेश्वर म्हटले जाते.

गोविंदेश्वर मंदिराचे साधर्म्य जसे खजुराहो मंदिराशी आहे तसेच ते ठाण्याच्या अंबरनाथ मंदिराशीही आहे. काळ्या पाषाणामध्ये हे मंदिर बांधले आहे. मंदिर हे पंचायतन प्रकारातले म्हणजे एक मुख्य मंदिर आणि त्याच्या आजूबाजूला चार आणखी मंदिरे असे आहे. इथे मुख्य मंदिर आहे ते शंकराचे आणि या मंदिराच्या भोवताली विष्णू, गणपती, सूर्य आणि देवी यांची मंदिरे आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराशी नंदी आहे. या सर्व मंदिरांना वेढणारी एक भरभक्कम तटबंदी आहे. या मंदिरांची एकूणच रचना, त्याची जागा आणि मंदिराचा परिसर हे सारेच एकमेकांना पूरक आहेत, असे वाटते.

कोरीव काम केलेले खांब, भितींच्या थोड्या पुढे आलेल्या भागांवर कोरलेली फुलांची नक्षी सारेच काही अप्रतिम म्हणावे असे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या पन्हाळी. त्यासुद्धा आकर्षक आणि उत्कृष्ट कोरीव कामाने मढवलेल्या आहेत. मंदिराच्या उत्तरेकडे असलेल्या पन्हाळीच्या थोडं वर एक आकर्षक सुंदर मुर्ती आहे. ती आहे हंसावर आरूढ झालेल्या ब्राम्हीची. दुसरी अशीच एक ती गजलक्ष्मीची. मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेली ही मुर्ती प्रत्येकाचे लक्ष काही वेळ खिळवन ठेवते. कोरलेल्या शिल्पाकृतीमध्ये समुद्रमंथनासारख्या पौराणिक कथांचे विषय कोरले आहेत. छतावरसुद्धा अनेक नक्षीदार वलय आणि मध्यभागी एखाद्या दागिन्याचे पदक वाटावे असे गोलाकार नक्षीदार शिल्प कोरले आहे.

त्यावेळी असलेल्या सामाजिक, धार्मिक परिस्थितीची स्पष्ट कल्पना इथल्या शिल्पाकृती करुन देतात. अष्टकोनाकृती स्तंभावर अनेक छोटी शिल्प कोरली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने मिरवणूक, पालखी, वादक, नृत्यांगना दाखवल्या आहेत. त्यावेळच्या समृद्धीचे दर्शन या शिल्पामधून होते.

मंदिराच्या पूर्वेला एक तलाव आहे. गोविंदेश्वराच्या या मंदिरात पर्यटनासाठी आवश्यक वाटावे असं सारं काही आहे. पण तरीही हे मंदिर काहीसे दुर्लक्षित असे आहे. गोविंदेश्वराचे हे सुंदर आखीवरेखीव मंदिर एकदा भेट द्यावे, असेच आहे.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही