नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


श्री मोरया गोसावी

Go down

श्री मोरया गोसावी

लिखाण  vijaynjoshi on Sat May 19, 2012 10:20 pm


श्री मोरया गोसावी हे नाव महाराष्ट्राच्या संतमंडळात कित्येक दशकांपासून नव्हे तर कित्येक शतकांपासून उल्लेखिलं जातं. हे नाव पुण्याजवळच्या चिंचवडशीही नव्हे तर चिंचवडशीच अधिक निगडित आहे. आज ही जनसामान्यांमध्ये याविषयी अपार श्रद्धा आहे.

श्री मोरया गोसावी आणि चिंचवड असं एक समीकरण जनमानसात दृढ झालं सअलं तरी त्यांचं मूळ घराणं कर्नाटकाच्या बिदर जिल्ह्यातील शाली या गावाचं. त्यामुळंचे या घराण्याची मूळ भाषा कन्नड. या घराच्याविषयी पारंपरिक माहिती मिळते ती अशी -
मूळ पुरुष लाहेभट - दायंभट, कानभट, सायंभट - वामनभट - श्रीमोरया गोसावी

वामनभटांना संतती नव्हती. ते विरक्त होऊन हिंडत हिंडत मोरगावला आले आणि तिथल्या देवाची मोरयाची भक्ती करु लागले. त्यांना मोरयाकृपेनं झालेल्या मुलाचं नाव त्यांनी 'मोरया' हेच ठेवलं. मोरगावात नयनभारती नावाचे योगी आले व त्यांनी मोरयांना अनुग्रह दिला व त्यांनीच थेऊरला जाऊन चिंतामणीची सेवा करण्याचा आदेश दिला. ते (मोरया) थेऊरला गेले व योगसाधना करु लागले. समाधी लागल्यावर एक वाघ त्यांच्यावर तुटून पडला तरी त्यांची समाधी भंगली नाही व वाघ त्यांना काहीच करू शकला नाही, अशी एक आख्यायिका त्यांच्याविषयी प्रचलित आहे.

त्यांच्या साधनेमुळं जनसामान्यांवर त्यांचा प्रभाव पडला. 'मोरया गोसावी' या नावाचा पूर्वेतिहास हा असा आहे. त्यांचा लौकिक वाढत चालला. लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. हे एका अर्थानं योग्य झालं असलं तरी त्यांच्या साधनेत व ईशसेवेत/ईशभक्तीत व्यत्यय येऊ लागला म्हणून ते तेथून निघून पवना नदीच्या काठावर असलेल्या किंवजाई देवीच्या लहानशा मंदिरात राहून वृक्षवल्लींच्या सहवासात एकाग्र मनांनं साधना करू लागले. एक अवलिया तिथं येऊन साधना करीत आहे, हा हा म्हणता ही वार्ता पंचक्रोशीत पसरली व लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. मोरया गोसावी हे तर करुणामूर्ती. लोकांना दु:ख मुक्त करणं, हा त्यांचा स्वभाव. त्यांच्या कृपेमुळं अंधांना दृष्टी व नि:संतानांना संतती लाभल्याच्या आख्यायिका त्यांच्या चरित्रात वर्णिल्या आहेत.

उत्तर आयुष्यात त्यांनी ताथवडच्या गोविंदराव कुलकर्णी यांच्या मुलीबरोबर विवाह केला होता व त्यांना मुलगा झाला होता. त्याचं नाव त्यांनी आपल्या उपास्यदेवतचंच 'चिंतामणी' हेच ठेवलं. अशा प्रकारे प्रपंच व परमार्थ यांचा समन्वय त्यांनी साधला होता, याचाही उल्लेख इथं करायला हवा. हा काळ म्हणजे पंधराव्या शतकाचा शेवट आणि सोळाव्या शतकाचा प्रारंभकाळ.

या काळात त्यांचे गुरु मयनभारती त्यांच्याकडे येऊन राहिले व काही काळानंतर त्यांनी तिथंच समाधी घेतली.

पुढं मोरया स्वामींनीही देऊळ मळ्यात समाधी घेतली.
avatar
vijaynjoshi
Newbie
Newbie

Posts : 3
Join date : 13/05/2012
Age : 43

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही