नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


शेंगा फ्राय - व्हेज मासे

Go down

शेंगा फ्राय - व्हेज मासे

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:22 pm


ऑफीसच्या कामातून कधी तरी एखादा दिवस सूटीचा लाभ मिळतो. मग घरात मूलींची मज्जा असते. बाबा घरात आहेत म्हणजे सूट्टीची नविन डिश हमखास मिळेल याची चर्चा सुरु होते. १/२ आठवड्यातले खाना खजाना, हायवे पॉईंट अथवा सुगरणीचे सल्ले सारखे आठवून यातलं काही मिळेल का ? अशी चर्चा होते.

मग माझाही प्रयत्न असतो, प्रत्येक वेळी नविन काहीतरी द्यायचं. परवा सूट्टी मिळाली आणि घरी जातांनाच मी मनाशी ठरवलं. स्टॉपवर उतरून शेवग्याच्या शेंगा खरेदी केल्या. (खर तर आमच्या घरी मोठ्ठं झाड आहे गांवी. कॉलनीत फुकट वाटल्या जातात.) आणि नव्या स्टाईलमध्ये मूलींसाठी शेंगा फ्राय अर्थात 'व्हेज मासे' द्यायचे निश्चित केले. (हल्ली घरात मांसाहाराला बंदी आहे.)

व्हेज फ्राय मासे तयार करण्यासाठी ८ ते १० शेवग्याच्या शेंगा, १ चमचा हळद, आवडीप्रमाणे लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण यांची दोन चमचे पेस्ट, दोन चमचे चिंचेचा कोळ, एक वाटीभर तेल, एक वाटी चणादाळीचे पीठ एवढे साहित्य लागते. (घरात खाणारे किती यावर सामुग्रीचा अंदाज घेतलेला बरा)

व्हेज फ्राय मासे (शेवग्याच्या शेंगा) तयार करण्यापूर्वी सर्व प्रथम शेंगा लहान तुकडे करुन उकडून घ्याव्यात. (शेंगाचे तुकडे जास्त शिजवू नये) तुकडे थंग झाल्यावर दोन उभे काप करावेत. त्यावर हळद, तिखट, मीठ, हिरवे वाटण लावून दहा मिनिटे तसेच ठेवावे. नंतर भज्यांसाठी पातळ पीठ करतो त्याप्रमाणे चनादाळीचे पीठ भिजवावे. या पीठात मसाल्यात ठेवलेल्या शेवग्याच्या शेंगा बुडवून कढईत तळाव्यात. थोडे कुरकुरीत होईपर्यंत तळण असावे. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडतो. व्हेज मासे म्हणूनही त्याची चव घेता येते. तळून झाल्यानंतर डीश सजवतांना त्यावर गाजर किसून घालावे... हा पदार्थ एकदा तरी घरी करून पहावा... तेवढीच वेगळी चव !
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही