नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


न्यूट्रिशस सॅलड

Go down

न्यूट्रिशस सॅलड

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 11:04 pm


महाराष्ट्राला स्व:ताची अशी एक खाद्यसंस्कृती आहे. अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाबरोबरच अन्य भारतीय खाद्यपदार्थ देखील लोक चवीने खातात. म्हणूनच अगदी महाराष्ट्रात मकेकी रोटी मिळते तर पंजाबात येथे झूनका भाकर मिळेल असा बोर्ड दिसतो. अगदी शिमल्याला गेलात किंवा कन्याकुमारीला गेलात तर तेथेही मुंबई भेळ ही पाटी हमखास दिसते. असे जरी असले तरी हेल्थ कॉन्शस असणार्‍या आणि खाण्यापिण्यावर प्रचंड कंट्रोल ठेवणार्‍यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. विशेषत: उत्तम आरोग्य हे उत्तम आहाराशी जोडलं गेलं आहे. म्हणूनच आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या जीवन शैलीशी एकरुप होतांना न्यूट्रिशस पदार्थ घेणे आवश्यक झाले आहे. अशाच प्रकारचे सर्व जिवनसत्व युक्त सॅलड आज येथे देत आहे.

साहित्य : एक छोटे सफरचंद, अर्धे पेरु, तीन-चार संत्र्याच्या फोडी, एक छोटी ढोबळी मिरची, एक गाजर, एक पान सेलवी दांडी, एक काकडी, तीन-चार बेदाणे, पाच-सहा स्कूप पपई व खरबूज, पाव कप गाईचे दूध (दह्यासाठी), कांदा, हिरवी मिरची, मोहरी पावडर, साखर, मीठ.

कृती : सफरचंद आणि पेरुच्या सालीसकट फोडी कराव्या. त्यात खरबूज व पपई घालावी. त्यात संत्र आणि बेदाणे घालावे. एक गाजर किसून काकडीच्या फोडी, ढोबळी मिरची बारीक चिरुन व सेलरीचे पान चिरुन घालावे. पाव कप गाईच्या दुधाच्या दह्याचा चक्का घ्या. त्यात एक चमचा कांदा चिरुन, पाव चमचा मोहरी पावडर फेटून आणि चवीला हिरवी मिरची पेस्ट, मीठ व पाव चमचा साखर घाला. या तयार ड्रेसिंगमध्ये वरील फळे व भाज्या घाला. गार करुन खायला द्या. यामधून जीवनसत्त्व अ व क मिळते. उत्तम रेषायुक्त तसेच प्रथिने व कॉल्शियमयुक्त आहे.

निरोगी व स्वस्थ शरीर ठेवण्यासाठी व्यायामाबरोबरच नैसर्गिक जीवनसत्व उपलब्ध करुन देणार्‍या पदार्थांचा आस्वाद घेणे गरजेच असते. जीवनसत्व देणारा हा खाद्यप्रकार अनुभवलाच पाहिजे.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही