नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


फणसाचे सांदणे

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

फणसाचे सांदणे

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:08 am


कोकण आणि खाद्य अशी एक स्वतंत्र ओळख आहे. घाटावरुन कोकणात गेलेला माणूस मासे आणि माशांचे प्रकार याशिवाय वेगळा विचारच करत नाही. अगदी माझ्या सारख्या शुद्ध शाकाहारी व्यक्तीला देखील मासे पाहिल्यानंतर खाण्याचा मोह आवरला जात नाही. अर्थात मासे म्हणजे शाकाहार खाण्यापुरते का होईना मनाची समजूत. तर विषय होता. कोकणी खाद्यपदार्थांचा.. माशांशिवाय असंख्य कोकणी पदार्थ मनाला आणि जिभेला भुरळ घातल्याशिवाय रहात नाहीत.

पहिल्यांदा जेव्हा मी कोकणात गेलो तेव्हा कोकणचं सौंदर्य पाहिलं.. पाहण्यात खाणं झालंच नाही. मग खास खायला म्हणून कोकणात गेलो. फणसाचे दोन प्रकार एक कापा आणि दुसरा बरका. दोन्ही खायला उत्तम. 'फणसाचे सांदणे' हा खाद्य प्रकार म्हणजे आधूनिक मराठी खाद्यांचा बादशहाच म्हटले पाहिजे..

फणसाचे सांदणे प्रत्येक घराघरातून कोकणात केले जाते आणि आवडीने खाल्ले जाते. हल्ली कोकणात शहरीकरण झालंय. तिथं हा प्रकार मिळेल की नाही शंका आहे परंतु ग्रामीण कोकणात फणसाचे सांदणे हमखास मिळेल.. आता कृतीच पाहूया कसे करतात ते.

फणसाचे गर प्रथम घ्यायचे. आतली बी काढून टाकायची.. फणसाचा गर मिक्सरवर बारीक करुन घ्यायचा. त्यात थोडे पाणी मिसळले तरी चालते. हे करतांना बरका फणस असेल तर उत्तम. या रसात तांदुळाचा बारीक केलेला रवा घ्यावा. त्यात गुळ घालावा. मुठ वळून कापा येईपर्यंत पीठ सरसरीत भिजवावे. त्यात थोडी हळद आणि मीठ चवीपुरते टाकायला हरकत नाही. हे सर्व मिश्रण तासभर तसेच ठेवावे. सर्व पदार्थ चांगले मुरले की मग चाळणीतून हे मुठकुळे वाफवून घ्यावे, नारळाच्या किंवा साध्या दुधासोबत हे सांदणे खायला मजा येते. अगदीच चांगला प्रकार करायचा असेल तर सांदणे करतांना इडली पात्र देखील वापरता येवू शकते. गरमागरम सांदणे खातांना व्वा ! काय मजा येते. मग चला तर कोकणातली ही अस्सल रेसीपी आता घरी देखील बनवता येवू शकते. फक्त फणस हवा..

तर महाराजा, कसंलं आलंय फिश... शुद्ध शाकाहारी कोकणी पदार्थांची चव पोटासाठी अधिकच चांगली नाही कां? म्हणूनच एका कवीने म्हटलंय -
फणसाचो गरो कसो गोड लागता,
बायल्येक घोव् तसा आवडता।।
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही