नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


परळी वैजनाथ

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

परळी वैजनाथ

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:18 am


'जवा आगळं काशी' म्हणजे काशीपेक्षाही जवभर श्रेष्ठ अशी ख्याती असलेले ठिकाण म्हणजे परळी वैजनाथ. बारा ज्योतिलिंगापैकी एक असलेले परळी वैजनाथाचे इतर ठिकाणांहून जास्त महत्व आहे.

वैजनाथ म्हणजे खरे तर वैद्याच्या भुमिकेत इथे असणारा शंकर त्यामुळेच श्रेष्ठ ठरला आहे. बीड जिल्ह्यामध्ये परळी वैजनाथ हे ठिकाण अंबाजोगाई पासून १६ कि.मी. अंतरावर आहे. वैजनाथाचे मंदिर हेमाडपंती आहे आणि एका टेकडीवर वसले आहे. या मंदिरात जाण्यासाठी घाटासारख्या पायर्‍या चढून जावे लागते. मुख्य मंदिर शंकराचे असले तरी या मंदिर परिसरात विष्णू, अंबा भवानी, मुरलीधर, गोपीनाथ, कासाराम, तुकाई, काळंकाई इत्यादी मंदिरे आहेत. याशिवाय एक गणपतीचे आगळंवेगळं मंदिर आहे. नेहमीसारख्या पोट सुटलेल्या लांब सोंडेचा गणपतीऐवजी इथला गणपती चक्क मल्लाच्या रुपाने आपल्याला दर्शन देतो.

हा गणपती अजुनही दार अडवून बसला आहे असे वाटते. कारण या गणपतीचे दर्शन घेऊनच मग वैजनाथाचे दर्शन घ्यायचे असते. फक्त इथेच महादेवाचा पार्वतीसह वास आहे आणि सोबत गणपतीही. परळीचा वैजनाथ हा असा कुटुंबवत्सल आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे महादेवाच्या मंदिरात एरवी गाभारा सभामंडपापेक्षा काहीसा खोल असतो पण इथे गाभारा आणि सभामंडप एकाच पातळीत आहे. गाभार्‍याला चार दरवाजे आहेत. स्वयंभू शिवलिंग मंदिरात असून ते शाळीग्राम शिळेचे आहे. ही पिंडी हातभर उंच आणि सुमारे दोन हात व्यासाची आहे. इथला महादेव वैजनाथ का झाला याची एक दंतकथा इथे सांगितली जाते. देवांनी आणि राक्षसांनी समुद्रमंथन केले. या मंथनातून हातात अमृताचा कुंभ घेऊन धन्वंतरी प्रगट झाले. या अमृतावर देवांचा आणि राक्षसांचाही डोळा होता. राक्षसांपासून अमृत वाचवायचे तर धन्वंतरींना कुठेतरी लपवणे आवश्यक होते. तेव्हा धन्वंतरींना या महादेवाच्या पिंडीत लपवण्यात आले. आणि तेव्हापासून इथला महादेव 'वैजनाथ' झाला. देवांना विजय प्राप्त करुन दिल्यामुळे या स्थानाला 'जयंती' आणि 'वैजयंती' अशी नावं मिळाली.

या मंदिरात चार वेळा पूजा होते. पुजेनंतर शिवलिंगावर मुखवटा चढवतात. गाभार्‍यात चार नंदादीप अखंड तेवत असतात. महाशिवरात्र, नवरात्र, आणि कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा याकाळात इथे मोठा उत्सव असतो. गुढी पाडव्याला मंदिरात समारंभपुर्वक गुढी उभारण्यात येते. यावेळी महादेवाला वस्त्रांनी दागिने आणि फुलांनी सजविण्यात येते.

आज अस्तिवात असलेल्या मंदिराचा जिर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनी केला आहे. मंदिराला दिशासाधन आहे. त्यामुळे विप्लव दिनाच्या दिवशी मंदिराच्या गाभार्‍याला असलेल्या गवाक्षातून सुर्यकिरण पिंडीवर पडतात.

दिलेला शब्द पाळलाच पाहिजे, हे शिकवण्यासाठी श्रीयाळ राजा आणि चांगुणा राणीची गोष्ट लहानपणी आपण ऐकलेली असते. तो श्रीयाळ राजा हा मुळचा परळी वैजनाथचाच, याशिवाय रामाने वनवासाला जातांना इथे विश्राम केला, असा उल्लेख आनंद रामायणात आणि लिळाचरित्रात आला आहे.

असा हा 'वैद्यांचा वैद्य' असलेल्या वैजनाथाने आरोग्याचा मंत्र आपल्या भक्तांना देण्यासाठी परळीला वास्तव्य केले आहे. आरोग्यपूर्ण कौटुंबिक जीवनाचा धडा देणारा वैजनाथ त्यामुळे काशीपेक्षा जवभर श्रेष्ठच आहे, असे म्हणायला काही हरकत नाही.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही