नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


संत बयाबाई

Go down

संत बयाबाई

लिखाण  Admin on Sun May 20, 2012 12:24 am

समर्थ संप्रदायामध्ये ज्या कवयित्री झाल्या त्यामध्ये 'वेणाबाई' यांचा प्रामुख्यानं उल्लेख केला जातो. संत बयाबाई या वेणाबाई यांच्या शिष्या होत. 'बयाबाई'चा उल्लेख 'बायजाबाई' असाही केला जातो. त्यांच्या स्थलकालाबद्दलची माहिती उपलब्ध होत नाही. तथापि ज्या समर्थ संप्रदायाचे एक प्रमुख संत गिरिधरस्वामी हे त्यांचे शिष्य होते, अशी माहिती उपलब्ध मिळते. 'बयाबाईंनी विपुल लेखन केलेलं नाही. सध्यातरी त्यांची अल्पस्वल्प स्फुटरचनाच प्रकाशात आली आहे. ती प्रामुख्यानं पदांच्या स्वरुपात आहे. या पदांमध्येही गुरुभक्तिपर आणि गुरुमाहात्म्यापर रचनेस विशेष महत्त्व आहे.

बयाबाईंच्या पदांमध्ये गुरुनं आपल्याला साधना कशी करावी, हे सांगितलं. या साधनेतील खाचखळगे, अडथळे आपल्या लक्षात आणून दिले. उपासनेतले हे अडथळे कसे दूर करावेत, याचं अचूक मार्गदर्शन केलं. त्यामुळे आपल्याला परमार्थ मार्गाची यथायोग्य कल्पना आली आणि आपल्या जीवनाचं कल्याण झालं. अशा आशयाची श्रद्धायुक्त भावना व आपल्या गुरुविषयीची अपार श्रद्धा बयाबाईंच्या पदांत व्यक्त झाली आहे. त्यांतून स्त्रीसुलभ भावनांचाही भक्तिमय अविष्कार त्यांच्या रचनेत झाला आहे.

बयाबाईंची रचना अत्यंत रसाळ असून गेयता हे तिचं वैशिष्ट्य आहे. अनेकदा ग्रामीण शब्दरुपांचा उपयोगही बयाबाई करतात. आपल्या गुरुविषयीची पराकोटीच्या आदराची भावना त्यांच्या पुढील पदात व्यक्त झाली आहे -

हा गुरुराजचि साचा सिंधु आनंदाचा
सा चारांला अंत न लागे कुंठित जाल्या वाचा
जाणिव टाकुनि नेणिव ग्रासुनि येचि लाभ तयाचा
भास निराभास होऊनिया एक हाचि भास जयाचा
गुरु हा विश्वंभर दास बयावर घाली पदर कृपेचा

अनेक संतांनी परमेश्वराला माता किंवा पिता यांच्या स्वरुपात पाहिलं आहे. आणि त्याच्याविषयीच्या आपल्या भावभावना आपल्या लेखनात प्रकट केलेल्या आहेत तर संत बयाबाई यांनी पुढील रचनेत आपल्या गुरुलाच आपली माता मानून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारचं लेखन मराठी संतसाहित्यात (माय-लेक स्वरुपातलं) फार कमी प्रमाणात आढळतं.

धावत येऊनि सद्गुरुमाय निज पान्हा देई
तुझिया विरहान लागे व्याकुळ जीव जाला पाही
इंद्रनिळाची कीळ गाळुनी शाममूर्ति घडिली
अष्ट दिशांना प्रभा व्यापुनि दश अंगुळ उरली
यमुनातीरी कुंजवनामधिं वाजवितो मुरली
याला पाहातां चित्तवृत्ति हे सखये घाबरली
मग दृढतर निश्चय मनात हा केला
खरि आग लाविली या साहा ईषणेला
निर्धूत होऊनि शरण गेले पायाला
चिद्ग्रंथीची गांठ सुटुनिया मिठी पडली पाई

समर्थ संप्रदायातील अनेक संतांनी मराठी प्रमाणेंच 'दक्खिनी' हिंदी भाषेतही लेखन केलं आहे. संत बयाबाई यांची 'दक्खिनी' मधील रचना पदस्वरुपात उपलब्ध होते. तथापि तिच्यामध्येही त्यांची आपल्या गुरुविषयीची श्रद्धा आणि भक्तिभाव प्रकट झाला आहे. वानगीदाखल त्यांचं एकपद पुढे देत आहे -

बर्‍या कहुं रे गुरुनाथ की बात में मस्तमया हे दिल मेरा रंगमे
लाल रंगमे सफेद खुला है कोई नहिं जाने आपभुला है
जब सद्गुरु के पगलिन होना रंगातीत रंग आपहि होना
रामदास गुरुपदकी दासी दास बया फिरो देस-विदेसी
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही