नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


तुळशी विवाह

Go down

तुळशी विवाह

लिखाण  Admin on Mon May 21, 2012 12:27 pm

पूर्वी तुळशीचे वृंदावन प्रत्येक घराच्या अंगणात असे आणि तुळशीबद्दलची माया प्रत्येक भारतीयाच्या मनाच्या हळव्या कोपर्‍यात असे. वृंदावने गेली. पण तुळशीबद्दल ममत्व आजही आपल्याला तेवढेच हळवे करते. तुळशीच्या पौराणिक कथा, तिचे कृष्णाबरोबर दरवर्षी लावले जाणारे लग्न हा आपल्या संस्कृतीचा अतिशय सुरेख पैलू आहे. आता तर सारे जग तुळशीचे औषधी गुण जाणून आहे. व्यापारी वृत्तीमुळे का होईना पाश्चात्य मंडळीही तुळशीचे पेटंन्ट घेऊन तिच्यावर आपला हक्क सांगण्यासाठी धडपडत आहेत. लोकगीतात तुळसही सार्‍यांचे लक्ष वेधून घेताना दिसते. एक सासुरवाशीण तुळशीला सांगत आहे, तुळशी ग बाई, तुझा जन्म रानींवनीं। बैस अंगणात, जागा देते वृंदावनी।। तू भले रानावनात, काट्याकुट्यात जन्मली असलीस म्हणून काय झाले, मी काय तुझी योग्यता जाणत नाही? झाला तेवढा वनवास पुरे झाला. आता जरा निवांतपणे माझ्या अंगणात वृंदावनात राहा. अगदी सुखाने राहा. तुळस मग वृंदावनात आली. साहजिकच घरातील कोणी ना कोणी बाई तुळशीला न विसरता पाणी घालू लागली. तिथेच जरा बसू लागली. तिच्याशी चार गुजगोष्टी करु लागली. अशाच एका आईचे तिची मुलगी वर्णन करते. तुळशीला पाणी घाली तुळशीखालीं बसे। प्रत्यक्ष गंगा दिसे, मायबाई।। तुळस पवित्र माझी आईही पवित्र. तुळशीला पाणी घालणारी जणू गंगाच.

लोक सकाळी उठून देवाचे दर्शन घेतात, मगच कामाला जातात. दिवस चांगला जावा म्हणून मीही माझ्या सखीचे म्हणजे तुळशीचे दर्शन घेते. सकाळी उठोनी, तोंड पाहिले एकीचें। माझ्या जीवाच्या सखीचें, तुळशीबाईंचे।। तुळशीला मंजिरी आल्या आहेत बरे का ? आमचे घर तिला चांगलेच मानवले आहे. तुळस पिकली, तिला आल्या शेंगा। तिला पाणी घाली, माउली माझी गंगा।। तुळशीच्या आजूबाजूला नेहमी कोण असते ? तुळशी ग माये, तुझ्या मंजुळ्या झळकती। तेथें कृष्णनाथ खेळती। सारीपाट।।

लोक उगीचच काशी काशी म्हणत एवढी दगदग सहन करीत एवढा मोठा प्रवास करुन काशीला जातात, पण मी नाही अशी घर सोडून धावत. कारण तुळशीच्या रुपाने माझ्या अंगणातच प्रत्यक्ष काशी अवतरली आहे. सारे घर - अंगण शुचितेने - पावित्र्याने भरुन गेले आहे. काशी काशी म्हणूनी, लोक जाती ग धांवत। काशी माझ्या अंगणांत। तुळसादेवी। काशी काशी म्हणूनी, लोक जातीं दुरी। काशी माझ्या घरीं, तुळसादेवी। संध्याकाळ झाली की तुळशीपुढे दिवा लावायचा ही तर आपली हजारो वर्षांची परंपरा. आजच्या युगातही ती मी कशी बरे विसरेन ? संध्याकाळ झाली, वाजले ग सात। तुळशीला हात। जोडीयेले।। तुळशीसमोर नतमस्तक होण्यातील सुख मी कशाला सांगू? तुम्हीच स्वत: अनुभव घ्या ना. कार्तिक महिन्यात तर तुळाशीला केवढा मान मिळतो. एकादशीला देवाला विविध अलंकारांबरोबर तुळशीची माळही घातली जाते. कार्तिक महिना, काकड्याची वेळ। तुळशीची माळ। विठोबाला।। एकदा तर द्वारकेत कृष्णराणा तुळशीच्या पत्रावळीवर आता बोला! तुळशीपानांच्या, लाविल्या पत्रावळी। जेवीले वनमाळी । द्वारकेत।। काल कार्तिकी एकादशी म्हणून आम्ही पंढरपुरी आलो. बघतो तर काय, तुळशीला असा बहर आला होता म्हणून सांगू! पंढरीसी जातां, पंढरी हिरवीगार। तुळशीला आला भर। विठ्ठलाच्या।। जो भक्त आला तो आपला येताना विठूरायाला तुळशीला हार आणि बुक्का घेऊन येत होता. त्याला तेच तर फार आवडते ना. पंढरपुरा जाऊं, भेटीला काय नेऊ? तुळशी बुक्क्याची, विठ्ठला प्रीत बहु।। मग आम्हीही तुळशीहार घेऊन गेलो. तुम्हीपण बरोबर तुळशीहार घेतला आहात ना? वाटलेच मला.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही