नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


समोसा

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

समोसा

लिखाण  Admin on Mon May 21, 2012 12:40 pm

शनिवारी सुटी असूनही ड्युटी होती. दुपारचा डबा नसल्याने संध्याकाळी टीमसोबत चहाला जाण्याचा योग आला. सुटीच्या दिवशी मंत्रालय परिसरात तसा शुकशुकाट असतो आणि कँटीनही बंद असते. अशा वेळी एअर इंडियाच्या जवळ असणारी खाऊ गल्ली कामी येते. अगदी भेळपुरी पासून थेट राईस प्लेट पर्यंत आणि वडापाव पासून समोशापर्यंत सारे पदार्थ तेथे मिळतात. चारच्या सुमारास तशी गर्दीही बर्‍यापैकी असते. नेहमीच्या स्टॉलवर आज वेगळीच पाटी दिसत होती. ''आज पंजाबी समोसा उपलब्ध है।'' ही पाटी वाचून आम्ही पंजाबी समोशाचा आनंद लुटला. समोसा खातच त्या समोशाची माहितीही घेतली. ती माहिती आज खास महान्यूजच्या वाचकांसाठी आम्ही देत आहोत.

यासाठी मटारचे अर्धा किलो दाणे, ३-४ फ्लॉवरची फुले, अर्धे छोटे लिंबू, ७-८ मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १ वाटी चिरलेली कोथिंबिर, १ चमचा धने-जिरे पावडर, १ चमचा लाल तिखट, हळद, हिंग, मीठ, साखर, २ वाट्या मैदा, तळण्यासाठी तेल हे साहित्य तयार ठेवावे.

कूकरमध्ये मटरचे दाणे व बटाटा शिजवावे, शिजलेले मटर चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून ठेवावे. नंतर मैदा भिजवावा. मैदामध्ये लाल तिखट, धनेजीरे पूड, थोडी हळद व हिंग, भाजलेले तीळ, चवीपुरते मीठ, चिरलेली कोथिंबीर व अर्धी वाटी तेल गरम करून त्यावर ओतावी. हे सर्व मिश्रण चमच्याने कालवून घ्यावे जेणेकरून सर्व पीठाला तिखट मीठाची चव लागेल. मैदा घट्ट भिजवावा आणि तो २ तास मुरवत ठेवावा.

आता लसूण, मिरच्या व कांदा खूप बारीक करून चिरावा. बटाटे कुस्करून घ्यावेत. फ्लॉवरची फुले बारीक चिरावी. त्यानंतर मटार, कुस्करलेला बटाटा, चिरलेला कांदा लसूण, मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, चिरलेले फ्लॉवर यामध्ये थोड लाल तिखट, हळद, हिंग, धनेपूड, चवीप्रमाणे मीठ व लिंबू पिळून सर्व मिश्रण परत एकसारखे कालवून घ्यावे.

आता भिजवलेल्या मैद्याचा छोटा गोळ घेऊन सर्वात पातळ व मोठी पोळी लाटावी. लाटताना तांदुळाच्या पिठीचा वापर करता येईल. या पोळीचे कातण्याने तीन भाग करावे. हे तीन भाग म्हणजे समोशाच्या पट्ट्या. ती तीन पट्ट्यांवर मटारचे केलेले सारण घालून खणासारखी त्रिकोणी घडी करावी. याप्रमाणे सर्व समोसे करून घेतल्यानंतर गुलाबी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर तेलात तेळावे व गरम गरम सर्व्ह करावे.

श्रावणात अशा पदार्थाना खूप मागणी असते. हे समोसे हिरव्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर खायला खूपच छान वाटते.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही