नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


Google Drive

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

Google Drive

लिखाण  Admin on Mon May 14, 2012 1:37 am

ऑफिसमध्ये एक कॉम्प्युटर, घरी दुसरा किंवा मग लॅपटॉप. एखादा स्मार्टफोन.. आणि या प्रत्येकावर एक खजिना. एखादी गोष्ट दुसर्‍यावर कॉपी करायची असेल तर मग हजार कटकटी. साइज मोठी. फॉरमॅट मॅच होत नाही यावर उपाय आहे.?

‘क्लाऊड कॉम्प्युटिग’चा एक नवा आणि स्वस्त पर्याय.
हाय !

हल्ली आपलं आयुष्य अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे ऑफिसमध्ये एक कॉम्प्युटर, घरी दुसरा किंवा मग लॅपटॉप. एखादा स्मार्टफोन.. आणि या प्रत्येकावर एक खजिना आपण साठवलेला असतो. आणि मग यातली एखादी गोष्ट दुसर्‍यावर कॉपी करायची असेल, तर मग हजार कटकटी.. किंवा घरी काम करायला बसावं आणि लक्षात येतं, ज्या फाइलवर काम करायचं ती तर इथे स्टोअर केलेलीच नाही ! किंवा मग आपल्याला जी फाइल एका डिव्हाइसवरून दुसरीकडे कॉपी करायची आहे ती खूपच मोठी आहे..

या सगळ्यावर उपाय म्हणजे ‘क्लाउड कॉम्प्युटिंग.’
म्हणजे आपल्या सगळ्या फाइल्स इंटरनेटवर सेव्ह करायच्या. आणि आपल्याला हव्या तेव्हा अँक्सेस करायच्या. या क्लाउड कॉम्प्युटिंगमध्ये आता गुगलने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

या सर्व्हिसचं नाव आहे - Google Drive

या सर्व्हिसवर तुम्ही नवीन फाइल्स क्रिएट क शकता, त्यात बदल क शकता, आणि या फाइल्स सेव्ह करून ठेवू शकता.

Google Drive Application डाऊनलोड केल्यावर तुमच्या कॉम्प्युटरवर एक फोल्डर तयार होईल. इथे तुम्ही तुम्हाला ज्या फाइल्स ड्राइव्हवर सेव्ह करायच्या आहेत त्या ड्रॅग करा. या फोल्डरवर तुम्ही जे काही साठवाल ते तुमच्या हार्ड डिस्कवरही राहील आणि क्लाऊडवरही सेव्ह होईल. या फाइल्स तुम्हाला मग अगदी तुमच्या मोबाईलवरूनही अँक्सेस करता येतील. या ड्राइव्हवर पाच जीबीचं स्टोरेज फ्री मिळेल. आणि जास्त स्पेस विकतही घेता येईल. हा ड्राइव्ह तुम्ही तुमचा कॉम्प्युटर, एन्ड्राईड फोन, टॅबलेट कशावरही इन्स्टॉल क शकता.

आता तुम्ही या सेव्ह केलेल्या फाइल्समध्ये बदल केलात तर तो फक्त एका ठिकाणी न होता प्रत्येक ठिकाणी होईल. याशिवाय गुगलचे Google Docs देखील आता या Google Drive मध्ये आहेत. शिवाय ही नवी सेवा गुगल ने ‘गुगल प्लस’लादेखील जोडलेली आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगची सेवा देणार्‍या सध्या अनेक वेबसाइट्स आहेत. Drop Box सारखी सेवा तर खूप आधीपासून आहे. पण या सगळ्यांच्या तुलनेत गुगलचे विकत घ्यायचे दर सध्या स्वस्त दिसताहेत.

हा Google Drive वापरायला सोपा आहे. आणि आता क्लाऊड कॉम्प्युटिंग हेच भविष्य असणार आहे. म्हणून माहिती स्टोअर करण्याचा हा नवा पर्याय लवकरात लवकर वापरायला सुरुवात करा.

- अमृता दुर्वे
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही