नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


गरमा गरम भजी

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

गरमा गरम भजी

लिखाण  Admin on Thu May 24, 2012 6:31 pm


महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू झाला. खवय्यांना कुठलाही मोसम हा चांगला वाटतो. खाण्यासाठी निमित्त पाहिजे. आणि पाऊस हे निमित्त ठरले. शनिवारच्या संध्याकाळी गप्पांचा फड मित्राच्या घरी रंगला आणि पाहता पाहता समोर आलेल्या भजीच्या प्लेट देखील संपत गेल्या. गप्पांच्या गर्दीत समोर आलेल्या भजीबद्दल मित्राला धन्यवाद द्यायलाही विसरलो. केवळ कांद्याच्या भजी पेक्षा अन्य भजींमध्ये देखील एक विशिष्ट चव असते. आणि बदलत्या वातावरणानुसार ती खाण्याची मजा वेगळी असते. या साठीच आज फ्लॉवर आणि कोबी या दोन्ही प्रकारची भजी कशी तयार करतात, याची माहिती देत आहोत.

कोबीची भजी


साहित्य :
अर्धा किलो कोबी, पाच - सहा हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, पाव चमचा सोडा, पाव किलो तेल, पाव किलो बेसन, (तेल आणि बेसन गरजेनुसार कमी -जास्त होऊ शकतं) चवीनुसार मीठ, थोडी कोथ्ंिाबीर.

कृती :-
कोबी बारीक चिरुन घ्या. त्यात आलं, कोथिंबीर, मिरच्या बारीक चिरुन टाका. या सगळ्याला मीठ लावा आणि पाच मिनिटं तसंच ठेवा. या मिश्रणाला पाणी सुटेल. आता त्यात मावेल तितके बेसन मिसळा. थोडा सोडा घालून सगळं मिश्रण एकजीव करा. थोडा तेलाचा हात लावून मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करा. हातावर जरा दाबून ते चपटे करा आणि गरम तेलात तळून घ्या. पुदीन्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाण्यास द्या.

फ्लॉवरची भजी


साहित्य :
एक किलो फ्लॉवर, हळद, तिखट, मीठ, बेसन.
कृती :
फ्लॉवर स्वच्छ करुन घ्या, मात्र तो बारीक करु नका, त्याची फुलं तशीच ठेवा. उकळत्या पाण्यात मीठ, हळद टाका आणि त्यत दहा ते पंधरा मिनिटं फ्लॉवरची ही फुलं ठेवा. त्यातला कचरा, कीड निघून जाईल. आत ही फुलं बाहेर काढा, त्यांना थोडं तिखट-मीठ लावा. उकडीचे मोदक आपण जसे चाळणीवर ठेवून वाफवतो, तशी ही फुलं वाफवून घ्या ती कच्ची राहायला नकोत, पण गच्च शिजून मऊही व्हायला नकोत. आता नेहमीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग घालून भज्यांचं पीठ तयार करुन घ्या. वाफलेलं एकेक फूल त्यात बुडवा आणि तळा. ही सोनेरी फुलं सॉसबरोबर अप्रतिम लागतात.

बाहेर मस्त पाऊस पडतो आहे. आणि अशा वेळी हातात रिमोट घेऊन विविध चॅनेलचे सर्फिंग करण्यापेक्षा खिडकीत उभं राहून हातातल्या प्लेटमधली गरम भजी खाणे हा आनंद आजच्या रविवारी घ्यायला हरकत नाही. अर्थात हे करताना आमची आठवण जरूर ठेवा.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही