नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


FACEBOOK पासून सावधान

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

FACEBOOK पासून सावधान

लिखाण  Admin on Thu Jun 07, 2012 12:42 pm

फेसबुक ' ही आता अनेकांची गरज झाली आहे. गरजेपेक्षा तिला व्यसन म्हणणं अधिक योग्य. सोशल नेटवर्किंग साइटचं व्यसन लागू शकतं , हे वाचायला विचित्र वाटत असलं , तरी इट्स अ फॅक्ट. दारू , ड्रग्ज इतकाच याचा विळखा घातक आहे.

फेसबुकच्या अॅडिक्शनवर बेतलेले विनोद नवे नाहीत. पण , आता ते विनोद उरलेले नाहीत. ती फॅक्ट होते आहे. फेसबुकचं व्यसन दिवसेंदिवस गंभीर होत चाललं आहे आणि ही गोष्ट आपल्या अजून तितकी प्रकर्षानं ध्यानात आलेली नाही. खरोखरच्या मित्रांपेक्षा फेसबुकवरच्या आभासी जगातले मित्र ' आपले ' , जवळचे वाटू लागतात. मग आपल्या मनातल्या खासगी गोष्टी त्यांना सांगाव्या वाटतात. पण , ही व्यसनाधीनतेची पहिली पायरी. मग , आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं ' स्टेटस ' टाकावं वाटणं , ही दुसरी. मध्यंतरी इथे ' फार्मव्हिले ' हा खेळही आला होता. त्यावेळी जेवण अर्धवट टाकून , कट्ट्यावरच्या गप्पा मधेच टाकून ' शेताला ' पाणी द्यायला धावणारी मंडळी आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली असतील.

अभ्यासकांनी केलेल्या अभ्यासानुसार या अॅडिक्शनची अनेक कारणं दिलीत. पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे इंटरनेटची सहज उपलब्धता. ऑफिस , घर आहेच. शिवाय आता मोबाइलमध्येही नेट आल्याने सोशल साइट वापरणं सोपं झालंय. एकदा वापर सुरू झाला की , मग , आपलं अकाउंट सजवणं , मग इतरांच्या अकाउंटमध्ये डोकावणं सुरू होतं. त्यानंतर ग्रुप जॉइन केले जातात. वाद घातले जातात. मग बघता बघता दररोजचे काही तास या गोष्टीत वाया जातात.
ओळखी करणं , व्यावसायिक उपयोग करणं , माहिती मिळवणं यासाठी या माध्यमाचा वापर करणारे खरंच किती आहेत याचा शोध घेतला , तर हाती फारसं लागत नाही ही वस्तुस्थिती आहे.

खरंच बुद्धिमान ?

आपली बौद्धिक क्षमता हा इथे महत्त्वाचा भाग असतो. तुम्ही जितके बुद्धिमान तितके तुमचे फॅन्स , तुमच्या मतांना लाइक्स जास्त. पुन्हा बुद्धिमत्ता मोजायची कशी , तर त्या व्यक्तिनं लिहिलेल्या पोस्टवरून. मग आपण बुद्धिमान दिसण्यासाठी तशा पोस्ट लिहिल्या जातात. खरोखरच अभ्यास करून लिहिलेल्या पोस्टवर उत्तर देण्यासाठी मग विकीपीडिया किंवा तत्सम साइटचा आधार घेतला जातो आणि कॉपी-पेस्टचं शस्त्र वापरलं जातं.

हो , हे व्यसनच आहे

इंटरनेट किंवा फेसबुक हे व्यसनच आहे. याला ' इंटरनेट अॅडिक्शन डिसऑर्डर ' असं म्हणतात. आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात या ' व्यसना ' पासून सोडवणूक करून घेण्यासाठी मुलं येतात. आम्ही त्यांचं कौन्सेलिंग करतो. आमच्याकडे येणाऱ्या मुलांचा वयोगट २२ पेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी तिघांना अॅडमिटही केलं होतं , यावरून याची तीव्रता लक्षात यावी. हे व्यसन लागूच नये , यासाठी मुलांनी आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पालकांनी विशेष काळजी घ्यायला हवी. मुलांशी जास्तीत जास्त मोकळा संवाद ठेवायला हवा.

मुक्ता पुणतांबेकर , उपसंचालक , मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र

आपण आहारी गेलो आहोत का ?

आपण फेसबुकच्या आहारी गेलो आहोत का , हे ओळखण्यासाठीचे काही मुद्दे यातला एखादा मुद्दा जरी लागू होत असेल , तरी ती धोक्याची घंटा समजा...

१. आपण कामाव्यतिरिक्त एक तासापेक्षा जास्त वेळ फेसबुकवर असता ?
२. फेसबुक पाहाता आलं नाही , तर अस्वस्थ वाटतं का ?
३. आपण फेसबुकवर जास्त वेळ घालवतो आहोत , हे पाहून घरचे अस्वस्थ होतात का ?
४. फेसबुकच्या वापरावरून कोणी काही बोललं , तर लगेच चिडचिड होते का ? त्यावरून लगेच खूप आक्रमकपणे स्वत:ची बाजू मांडली जाते का ?
५. बराच वेळ फेसबुकवर गेल्यामुळे अभ्यास किंवा जबाबदाऱ्यांवर परिणाम होतो का ?
६. मित्रांना प्रत्यक्ष भेटणं कमी झालं आहे का?
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही