नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


ब्लॉगरच्या दुनियेत

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

ब्लॉगरच्या दुनियेत

लिखाण  sandykul07 on Tue May 15, 2012 12:17 pm

आपल्या मनातील गोष्टींना वाट मोकळी करून देण्यासाठी बहुतेक लोक लिखाणाचा पर्याय निवडतात. पण सर्वांनाच काही पुस्तक काढणे शक्य नसते. अशावेळी अनेकजण फेसबुक, ट्विटर अशा वेबसाइट्सच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत असतात. पण तेथेही काही मार्यादा येतात. अशावेळी ब्लॉगचा पर्याय लिहते राहण्यासाठी उपयुक्त ठरतो. यामुळे बहुतांश लोक सध्या ब्लॉगकडे वळू लागले आहेत. ब्लॉग कसा सुरू करायचा. आपला ब्लॉग कसा लिहायचा असे विविध प्रश्न उपस्थित होतात. या विषयी...

ब्लॉग आयडिया

ब्लॉगमध्ये आपल्याला पाहिजे ते लिहता येऊ शकते. कारण तो आपला असतो. पण पुस्तकांप्रमाणेच तो लोकांनी वाचावा यासाठी त्यामध्ये काहीतरी क्रिएटीव्ह, वेगळे पण असणे गरजेचे असते. यामुळे तुम्ही एखादी संकल्पना घेऊन ब्लॉग सुरू केल्यास तो अधिक वाचनीय होऊ शकतो. मग ती संकल्पना मुक्त चिंतनाची असो किंवा माहितीपर लेखांची असो. पण आपल्या ब्लॉगला एखादी दिशा असणे महत्त्वाचे आहे. तुमचा ब्लॉग एखाद्या विषयाला धरून असेल तर त्याचा चांगला प्रभाव पडू शकतो.

ब्लॉग कसा सुरू करायचा

ब्लॉग सुरू करणे हे सध्या खूप सोपे झाले आहे. ब्लॉगर डॉट कॉमसारख्या अनेक वेबसाइट आपल्याला विनाशुल्क ब्लॉग सुरू करून देतात. यासाठी आपल्याला त्या साइटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायची गरज असते. यामध्ये आपली प्रोफाइल संपूर्ण लिहणे केव्हाही योग्य ठरते. कारण तुमची प्रोफाइल वाचून अनेक जण तुमचा ब्लॉग फॉलो करायचा की नाही हे ठरवतात. यानंतर तुम्ही थेट ब्लॉग लिहायला सुरू करू शकतात. ब्लॉग चांगला दिसावा यासाठी विविध थिम्स साइटवर उलब्ध असतात. याचबरोबर तुम्ही तुमच्या सोईनुसार काही फोटोजही ब्लॉगच्या बॅकग्राऊंडसाठी वापरता येऊ शकतात.

ब्लॉग आणि पैसा

तुमचा ब्लॉग तुमचे पैशाचे साधन होऊ शकते. तुमच्या ब्लॉगला मिळणाऱ्या हिट्स आणि तुमचे फॉलोवर्स यावरून तुम्हाला जाहिरातीही मिळू शकता. या जाहिरातींच्या प्रत्येक क्लिकवर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात. यासाठी तुमचा ब्लॉग व्यावसायिक वेबसाइट्सच्या तोडीस तोड असला पाहिजे. तुमचा जर व्यवसाय असेल तर त्याचे प्रमोशन करण्यासाठी तुम्ही वेबसाइटच्या ऐवजी ब्लॉगचा वापर करू शकता. यातून एकही रूपया खर्च न करता तुमची जाहिरात होऊन चांगला बिजनेस मिळवता येऊ शकेल

sandykul07

Posts : 4
Join date : 14/05/2012

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही