नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


विदर्भातील हिरकणींचा गौरव

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

विदर्भातील हिरकणींचा गौरव

लिखाण  mansijoshi on Tue May 15, 2012 10:42 pm

विदर्भातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणार्‍या हिरकणींच्या कर्तृत्वाला लोकमत सखी मंचने लोकमत विदर्भ सखी गौरव अवॉर्ड देऊन मदर्स डेच्या पूर्वसंध्येला शनिवारी सलाम केला.

लोकमत विदर्भ सखी गौरव अवॉर्ड २0१२ व जीवनगौरव पुरस्कार प्रदानाचा शानदार सोहळा शनिवारी सायंकाळी नागपुरातील चिटणीस पार्कवर पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा उपस्थित होत्या. व्यासपीठावर मातोश्री वीणादेवी दर्डा, लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खासदार विजय दर्डा, लोकमत सखी मंचच्या अध्यक्ष ज्योत्स्ना दर्डा, रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या सात महिलांचा लोकमत विदर्भ सखी गौरव पुरस्कार देऊन व महिलांच्या उत्थानासाठी झटणार्‍या विदर्भातील आठ ज्येष्ठ महिला समाजसेविकांचा लोकमत सखी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

लोकमत विदर्भ सखी गौरव पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रातील पुरस्कारासाठी बुलडाण्यातील येथील स्त्री मुक्ती संघटनेचे कार्य करणार्‍या शाहिना पठाण, शुभदा देशमुख, रजिया सुल्ताना, रेखा पिंपळशेंडे व झिंगुबाई बोलके यांना नामांकन मिळाले होते. शाहिना पठाण यांना हा पुरस्कार ममता शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. क्रीडा क्षेत्रासाठी अरुंधती पानतावणे, अंध जलतरणपटू कांचनमाला पांडे, तृप्ती गायधने, मोनिका व रोहिणी राऊत आणि शीतल भोयर यांना नामांकन मिळाले होते.

कांचनमाला पांडे यांना हा पुरस्कार घोषित झाला. शौर्य क्षेत्रासाठी गडचिरोलीतील पोलीस शिपाई कमला आलाम, मनीषा तुरा, मेधा साठे व सुहासिनी मेश्राम यांना नामांकन मिळाले होते. हा पुरस्कार कमला आलाम यांना घोषित झाला. शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉ. कमल सिंग, सुचिता सोळंके, डॉ. प्रीती बजाज, डॉ. शोभा ग्रोवर व डॉ. थ्रीटी पटेल यांना नामांकन मिळाले होते. डॉ. कमल सिंग यांना हा पुरस्कार मिळाला. साहित्य क्षेत्रासाठी अंजनाबाई खुणे, उषाकिरण आत्राम, अपूर्वा सोनार, प्रभा गणोरकर, अरुणा सबाने यांचे नामांकन होते. या पुरस्कारासाठी अपूर्वा सोनार यांची निवड झाली.
वैद्यकीय क्षेत्रासाठी प्रा. अनुराधा श्रीखंडे, डॉ. दीप्ती जैन, डॉ. कविता सातव, डॉ. विभावरी दाणी व डॉ. अर्चना पटेल यांना नामांकन मिळाले होते. डॉ. अर्चना पटेल यांना हा पुरस्कार मिळाला. उद्योग क्षेत्रासाठी डॉ. ऋचा जैन, डॉ. अनिता राव, गीता कोठा, प्रियांजली सन्याल व आरती देवधर गान यांना नामांकन मिळाले होते. पुरस्कार प्रियांजली सन्याल यांना मिळाला.

संचालन श्‍वेता शेलगावकर यांनी केले. या समारंभाचे प्रायोजक व्हिडिओकॉन तर जीएमआर करमणूक पार्टनर होते. रायसोनी ग्रुप सहप्रायोजक होते. यूसीएन, रेडिओ मिर्ची व जेमिनी यांनी या सोहळ्यासाठी सहाय्य केले.
avatar
mansijoshi
Newbie
Newbie

Posts : 10
Join date : 13/05/2012

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही