नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे :: 1 Bot

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


लोकशाही म्हणजे प्रतिनिधिशाही नव्हे

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

लोकशाही म्हणजे प्रतिनिधिशाही नव्हे

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 8:12 pm

'चाकोरीतून बाहेर काढावे वैधानिक कार्य' या मथळ्याचा श्री. विनय सहस्रबुद्धे यांचा लेख वाचला. (सकाळ ः 1 मे ) लेखकाने सध्याच्या विधानमंडळाच्या कामकाजावर भाष्य केले आहे. तसेच विविध गटांचे प्रतिनिधित्व विधान परिषदेमध्ये असावे, असा उपायही सुचविला आहे. हा उपाय अयोग्य आहे. लोकशाहीमध्ये प्रतिनिधी निवडून त्यांच्याद्वारा कारभार करण्याची तरतूद आहे. तशी पद्धती सध्या कार्यरत आहे, परंतु त्याचा अर्थ ती प्रतिनिधिशाही नाही, हे लेखकांनी विचारात घेतलेले नाही, म्हणूनच विविध गटांचे प्रतिनिधी विधान परिषदेत असावेत व त्यासाठी घटनादुरुस्ती करावी, असेही त्यांनी सुचविले आहे. हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वाशी जुळत नाही. लोकशाही पद्धतीमध्ये पूर्ण कारभार हा निरपेक्ष भावनेने केला पाहिजे, असे अंगभूत तत्त्व असते. त्यामुळे कारभारावर कोण्या एका गटाचा प्रभाव राहत नाही म्हणूनच गटाच्या प्रतिनिधीऐवजी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धती निवडीसाठी स्वीकारली तर विधानमंडळाच्या वैधानिक कामकाजामध्ये गुणात्मक सुधारणा होईल. मत म्हणजे बुद्धीच्या साह्याने उपलब्ध विषयज्ञानावर आधारित निर्णय होय. त्यामुळे एका व्यक्तीने व्यक्त केलेल्या मताबाबत बहुमत/ बहू बहुसंख्य/ सार्वमत होऊ शकते किंवा होते, हे आपण अनुभवतो. हे फक्त विधानमंडळातच होऊ शकते व लोकशाही राज्य पद्धतीचे हे वैशिष्ट्य आहे. प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा नसोत; तसेच ते कोणत्या मतदारसंघातील आहेत, हे महत्त्वाचे नसते; त्यांनी सादर केलेला मुद्दा व मत हे पूर्ण राज्याचे/ प्रदेशाचे मानले जाते. व ते योग्य असेल तर सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधीही त्यास मान्यता देतात. हे फक्त लोकशाहीतच होते.

- दि. ब. सहस्रबुद्धे, सोलापूर

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही