नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


मे २०१२ चे राशीफल

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

मे २०१२ चे राशीफल

लिखाण  Admin on Sun May 13, 2012 3:25 pm

मेष :
महिन्याच्या सुरुवातीलाच रवि-चंद्राचा होणारा शुभयोग प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीतून आपली कामे मार्गी लावणारा राहील. नवीन ओळखीतून लाभ होतील. नोकरीत बढती - बदलीचे योग येतील. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. चंद्र-शनिची युति लोखंड, जुन्या मालाचे व्यावसायिकांसाठी फायदेशीर राहील. आपला स्वभाव काहीसा अंतर्मुख होऊ शकतो. छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड होईल. ८ मे रोजी मंगळ-हर्षलचा होणारा योग आपणांस धाडसी, महात्त्वाकांक्षी बनविणारा राहील. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांकडून चांगली कामगिरी होईल. हातून सत्कर्म घडेल. बुध-नेपच्युनचा योग संगीत क्षेत्र, नाट्यक्षेत्र यात क्रांती करेल. गूढशास्त्राविषयी ओढा वाढेल. आपल्या वाक्चातुर्याच्या जोरावर मोठी मजल माराल. आजूबाजूच्या लोकांना आपलेसे कराल. संशोधनपर अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना यश मिळेल. रवि-गुरुची १३ मे रोजी होणारी युति आपला आध्यात्मिक ओढा वाढविणारी राहील. आध्यात्मिक क्षेत्रात चांगले अनुभव येतील, चांगला मार्गदर्शक भेटेल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. मात्र शनि-रविचा होणारा षडाष्टक योग कुटुंबातील व्यक्तीच्या प्रकृतिची काळजी वाढविणारा राहील. राजकीय क्षेत्र तसेच जनसंपर्कात असणार्‍या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. महिन्याच्या उत्तरार्धात शनि वक्री होऊ न कन्याराशीत येत आहे जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता राहते.

व्रुषभ
महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे १ मे रोजी आपल्या राशीच्या सुखस्थानातून चंद्र-मंगळाची युति होत आहे. स्थावर मालमत्तेचे रेंगाळलेले व्यवहार मार्गी लागतील. जमीन खरेदी कराल. घरातील सुखसुविधा वाढविण्याकारता इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. कौटुंबिक जबाबदारी स्वीकाराल. चंद्र-शनिच्या युति योगामुळे मनावर एखाद्या गोष्टीचा ताण येऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. १0 तारखेला होणारा बुध-नेपच्युनचा योग विद्यार्थ्यांची प्रगती करणारा आहे. गूढशास्त्राची आवड वाढविणारा आहे. १३ तारखेला व्यवस्थानातून रवि-गुरुची युति होत आहे. धार्मिक क्षेत्रातून ओढा वाढेल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. हातून सत्कर्म घडेल. सूचक स्वप्ने पडतील. पुढे घडणार्‍या घटनांची चाहूल लागेल. रवि-शनिच्या षडाष्टक योगामुळे अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कौटुंबिक रेगाळलेल्या व्यवहारातून काही कटकटी निर्माण होण्याची शक्यता आहे. २0 तारखेला होणारे सूर्यग्रहण गर्भवती महिलांसाठी त्रासदायक ठरु शकते. त्यामुळे प्रकृतीची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. १७ मे रोजी गुरुमहाराज आपल्या राशीत पदार्पण करीत आहेत. तेथील रविशी होणारा शुभयोग आपल्या आध्यात्मिक प्रगतीस अनुकूल आहे. रवि-बुधाचा होणार शुभयोग नवीन व्यावसायिक करारांतून फायदा करुन देईल. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात चांगले यश देण्यास अनुकूल ग्रहमान आहे.

मिथुन
महिन्याच्या सुरुवातीला आपणास अतिशय अनुकूल ग्रहमान लाभले आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश लाभेल. रवि-चंद्राचा त्रिकोणयोग आपली सामाजिक प्रतिमा उंचावणारा राहील. समाजात आपल्या मतांचा आदर केला जाईल. नोकरीत बढती-बदलीचे योग येतील. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा केली जाईल. नवीन व्यावसायिक कार्यारंभ केले जातील. चंद्र-गुरुच्या शुभयोगामुळे आपल्या प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. नव्या जोमाने कामाल लागाल. भावंडांसंबंधी सुवार्ता कानी येतील. भावंडांचे विवाह ठरतील. बुध-शनिच्या प्रतियोगामुळे आपली पूर्वनियोजित कामे योग्य मार्गाने यशस्वी करता येतील. आपल्या सकारात्मक विचारांमध्ये वाढ होईल. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक बनेल. मंगळ-हर्षलचा योग आपल्याला महत्त्वाकाक्षी बनविणारा राहील. एखादे अवघड काम करू शकू असा आत्मविश्‍वास वाढेल. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून चांगली कामे होतील. सामाजिक पत वाढेल. महिन्याच्या उत्तरार्धात ग्रहण मनस्वास्थ बिघडविणारे राहील. कोणतेही अवाजवी साहस करु नये. लेखकांकडून होणार्‍या टिकात्मक लिखाणामुळे वादंग उद्भवू शकतात. १३ तारखेला लाभस्थानी होणारी रवि-गुरुची युति आध्यात्मिक प्रगती करणारी राहील. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांतून चांगले यश मिळेल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. कामानिमित्त घडणार्‍या प्रवासातून कार्यसिद्धी होईल. महिन्याच्या उत्तरार्धात व्ययस्थानी जाणारे रवि-गुरु-बुध तीर्थक्षेत्री प्रवास घडवून आणतील

कर्क
अतिशय अनुकूल असे ग्रहमान आणांस महिन्याच्या सुरुवातीला लाभले आहे. रवि-चंद्राचा होणारा त्रिकोणयोग आपल्या उत्कर्षाला पूरक आहे. नोकरीत बढती-बदलीचे योग येतील. नवीन जबाबदारी स्विकाराल. व्यवसाय-उद्योगाच्या निमित्ताने प्रवासयोग घडतील. नवीन व्यवसायासाठी भांडवल गोळा करता येईल. सरकारी परवाने मिळतील. चंद्र-शनिच्या युति ४ तारखेला होत आहे. मन विषण्ण करणारी घटना घडेल. आप्त स्वकीयांमधे गैरसमज निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. शनि-बुधाचा प्रतियोग ६ तारखेला होत आहे. नवीन करार करणे टाळावे. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना वडिलधार्‍या व्यक्तींचा सल्ला घ्यावा. कोणताही निर्णय घेताना अतियश सतर्क राहावे लागेल. चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागेल. आपल्या सहकार्‍यांबरोबर संबंध बिघडण्याची शक्यता राहते. त्यामुळे बोलताना जीभेवर साखर पेरणी करण्याची जरुरी आहे. मात्र रवि-गुरुची युति आपणास सर्व अडीअडचणीतून बाहेर काढण्यास मदत करणारी आहे. प्रतिष्ठित व्यक्तींशी ओळखी होतील, त्यांच्या सहकार्याने काही रेंगाळलेली कामे मार्गी लावता येतील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यक्तींसाठी हे ग्रहमान अतिशय पूरक आहे. उत्तरार्धात वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे तसेच आपली महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत.

सिंह
या महिन्यात आपणास साडेसातीचा काहीसा त्रास जाणवणार आहे. कारण १६ तारखेला शनि वक्री होऊ न आपल्या राशीच्या धनस्थानात प्रवेश करीत आहे. तर आपल्या राशीत मंगळ ठाण मांडूनच बसला आहे. त्यामुळे आर्थिक घडामोडी विलंबाने होतील. अथवा महत्त्वाचे आर्थिक व्यवहारात काही कारणांनी कटकटी होण्याची संभावना आहे. १७ तारखेला पंचमेश गुरु वृषभ राशीत म्हणजे आपल्या कर्मस्थानात प्रवेश करीत आहे. रवि, शुक्र देखील तेथेच आहेत. त्यामुळे व्यवसाय, उद्योगात चांगली भरभराट होईल. नवीन कार्यारंभ केले जातील. नोकरीत पदोन्नती होईल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखीतून आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक उत्कर्ष घडून येईल. नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना सुसंधी लाभतील. बढती-बदलीचे योग येतील. आवक वाढेल. मात्र आपले तत्त्व सोडून कोणतेही निर्णय घेऊ नका. कोर्ट-कचेरीतील कामे योग्य निर्णयाने पूर्णत्वास जातील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. गृहद्योगातून तसेच जोडधंद्यातून फायदा होईल. महिला आपल्या व्यवसायातून कामाचा व्याप वाढवतील. सहकार्‍यांचे चांगले साहाय्य मिळेल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटीतून आनंद मिळवाल. संततीच्या प्रकृतीची काळजी वाटेल. गर्भवती महिलांनी आपल्या प्रकृतीस जपावे.

कन्या
आपल्या राशीला साडेसाती चालू असली तरी या महिन्यातील ग्रहमान आपणांस अनुकूल फलदायी आहे. १६ तारखेला शनि आपल्या राशीत वक्री होऊ न प्रवेश करीत आहे, तर भाग्यस्थानी वृषभ राशीत गुरुमहाराज प्रवेश करीत आहेत. राशितील शनि व सप्तमातील हर्षल आपणास वैयक्तिक दृष्ट्या त्रासदायक ठरु शकतात. मन सैरभैर होणार्‍या घटना घडतील. मनावरील दडपण कमी करण्यासाठी जवळच्या नातलगाचा सल्ला घ्यावा. पूर्वनियोजित कार्यक्रमात काही कारणाने अनपेक्षितपणे बदल करावे लागतील. भागीदारी व्यवसायातील प्रत्येक कामात स्वत जातीने लक्ष घालण्याची गरज आहे. नाहीतर फसवणूक होऊ शकते. आपली कामे दुसर्‍यांवर सोपवू नका. नातलगांमधे तसेच जवळच्या व्यक्तींमधे गैरसमज निर्माण होणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्यावे. व्ययस्थानातून मंगळाचे भ्रमण होत आहे. त्यामुळे अनावश्यक खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल. गुरु-शुक्राचे होणारे भ्रमण आपणांस पूरक राहील. सहलीचे आयोजन केले जाईल. धार्मिक स्थळांना भेटी देण्याचे योग येतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या सल्ल्याने उद्योग व्यवसायात आपणास स्थिरता लाभेल. परप्रांताशी व्यावसायिक संबंध सुधारतील. स्वतची प्रतिष्ठा वाढेल अशी खरेदी केली जाईल. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. आपले कामे मार्गी लावताना जीभेवर साखर पेरणी करण्याची गरज आहे. नवनवीन उपक्रम राबविले जातील. राजकीय, सामाजिक क्षेत्रातून आपली पत वाढेल. नवोदित कलाकारांना प्रसिद्धी लाभेल.

तूळ
आपल्या राशीतून शनिमहाराज वक्री होऊ न आपल्या व्यय स्थानात कन्या राशीत जात आहेत. त्यामुळे अनावश्यक खर्चाचे प्रमाण या महिन्यात वाढणार आहे. कुटुंबातील वयस्कर व्यक्तीच्या आजारावर खर्च होईल. अष्टमस्थानात प्रवेश करीत असलेल्या गुरुमुळे आपणास गुरुचे पाठबळ राहणार नाही. धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्राकडे आपला ओढा वाढणार आहे. अनपेक्षित धनलाभ घडून येईल. २0 तारखेला होणारे सूर्यग्रहण आपणास अनुकूल नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय घेताना अत्यंत विचारपूर्वक घ्यावेत. प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. व्यवसाय उद्योगाच्या दृष्टीने बुध-रविचे होणारे भ्रमण आपणास फायदा करून देईल. नवीन करार होतील. बड्या व्यक्तींचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील. वरिष्ठांचा वरदहस्त लाभेल. सरकारी सवलतींचा लाभ घेता येईल. बुध-गुरुचा योग आपला वैयक्तिक उत्कर्ष करणारा राहील. विवाहेच्छुक तरूणांचे विवाह ठरतील. जनसंपर्कातून लाभ होतील. शैक्षणिक कार्यरत असणार्‍या व्यक्तींसाठी पूरक ग्रहमान राहील. धार्मिक-आध्यात्मिक क्षेत्रातून प्रगती राहील. अनपेक्षित धनप्राप्ती झाल्याने समाधान लाभेल. लाभातील मंगळ खेळाडूंचा उत्कर्ष घडविणारा राहील. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.

व्रुश्चिक
महिन्याच्या उत्तरार्धात शनि वक्री होऊ न आपल्या लाभस्थानात जात आहे. तेव्हा साडेसातीच्या त्रासाची तीव्रता काही अंशी कमी होईल. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. तर आपल्या राशीच्या सप्तमात येणारा गुरु आपणास अनुकूल फलदायी आहे. तेथील शुक्र देखील पूरक राहील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल. पण त्याचबरोबर आपली आवकही वाढल्याने समाधान लाभेल. धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. तसेच आपल्या हौसेमौजेखातर खर्च कराल. दशमस्थ मंगळ खेळाडूंना यश देणारा राहील. चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. राजकीय क्षेत्रातून आपले वर्चस्व वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रातून आपली पत उंचावेल. सप्तमस्थ गुरु-शुक्रामुळे विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरविण्यास सहाय्य होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. जोडीदाराच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवपरिणितांना गोड बातमीची चाहूल लागेल. भागीदारी व्यवसायातून व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. कामाच्या विस्ताराचा ध्यास घ्याल. नवीन कार्यारंभ होतील. फर्निचर, रंग, केमिकल्स, चैनीच्या वस्तु या संबंधीचे व्यवसाय करणार्‍या व्यावसायिकांना चांगला फायदा होईल. सतत नवनवीन योजनांची अंमलबजावणी कराल. नवेदित कलाकारांना सुसंधी लाभतील. महिला घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. दशमस्थ मंगळ पोलिस खात्यातील व्यक्तींना पदोन्नती देईल.

धनु
महिन्याच्या सुरुवातीला संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने प्रवास घडून येतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. संतसज्जनांचा सहवास लाभेल. हातून पुण्यकर्म घडेल. महिन्याच्या उत्तरार्धात १६ मे रोजी शनि महाराज वक्री होऊ न आपल्या दशमस्थानी कन्या राशीत प्रवेश करीत आहेत. उद्योग व्यवासायातील कामे विलंबाने पार पडतील तर प्रत्येक कामात जातीने स्वत लक्ष घालण्याची गरज आहे. हितशत्रूंच्या कारवायांना सामोरे जावे लागेल. वकील, जुन्या वस्तुंचे व्यापारी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांची रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. संपादक, प्रकाशक यांच्या कामाचा व्याप वाढणार आहे. सतत कामाच्या व्यापात राहिल्याने आपल्या आहार विहाराकडे दुर्लक्ष करु नका. पोटाच्या तक्रारी तसेच मधुमेही व्यक्तींना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. जुने आजार डोके वर काढतील. २0 मे रोजी होणारे सूर्यग्रहण गर्भवती महिलांना त्रासदायक राहील. आपल्या संततीच्या आरोग्यासंबंधी काळजी वाटेल. षष्ठस्थानातील शुक्रभ्रमण आपणांस अचानक धनप्राप्ती देणारे राहील. पूर्वनियोजित प्रवासात काही कारणाने बदल करावे लागतील. कोणतेही अवाजवी साहस टाळावे. महिलांनी जिभेवर साखरपेरणी करण्याची गरज आहे

मकर
महिन्याच्या सुरुवातीला सुखस्थानातून होणारे गुरुचे भ्रमण घरात धार्मिक शुभसमारंभाचे आयोजन करणारे राहील. सत्संग लाभेल. बड्या व्यक्तींचे घराला पाय लागतील. १६ तारखेला शनि वक्री होऊ न आपल्या भाग्य स्थानात कन्या राशीत तर १७ तारखेला गुरु वृषभ राशीत पंचमस्थानात प्रवेश करीत आहे. पूर्वनियोजीत लांबच्या प्रवासात काही निमित्ताने अडीअडचणी येण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल. इेी ळी रश्रुरूी ीळसहीं हे लक्षात ठेवावे. वरिष्ठांची मर्जी राखून काम केल्यास आपलाच फायदा होईल. व्यवसायात कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नवीन कार्यारंभ कराल. सरकारी परवाने मिळतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. पंचमस्थ गुरु व भाग्यातील शनि विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश देणारे राहतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश लाभेल. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणे सोपे होईल. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. विवाहेच्छुक तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. धार्मिक कार्याचे कुटुंबात आयोजन केले जाईल. तीर्थस्थळांना भेट देण्याचे योग येतील. पंचमस्थ स्वराशीचा शुक्र आपल्या आवडत्या छंदातून आनंद देणारा राहील. व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी महिलांना अनुकूल ग्रहमान आहे. अष्टमस्थ मंगळ उष्णतेच्या विकारांचा त्रास वाढविणारा राहील. वाहन चालविताना दक्षता घ्यावी.

कुंभ

सप्तमस्थ मंगह जोडीदाराचा पगडा वाढविणारे आहे. राशितील नेपच्यूनचा मंगळाशी प्रतियोग करीत आहे. हा योग मनस्वास्थ बिघडवू शकतो. आपल्या मताशी ठाम राहून प्रत्येक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरविताना पूर्ण चौकशीअंती निर्णय घेणे. महिलांनी विवाहाचे बाबतीत मध्यस्थी करू नये. १६ तारखेला शनि वक्री होऊ न आपल्या राशीच्या अष्टमान असणार्‍या कन्या राशीत येत आहे. त्यामुळे जुने आजार डोके वर काढतील. तसेच दीर्घ मुदतीच्या आजारांचा त्रास होईल. त्यामुळे आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. पूर्वनियोजित प्रवासात अडचणी उद्भवू शकतात. १७ तारखेला गुरु आपल्या सुखस्थानात प्रवेश करीत आहे. त्यामुळे वाहन - वास्तूचे प्रश्न सुटतील. स्थावर मालमत्तेच्या रेंगाळलेल्या व्यवहारांना गति मिळेल. घरात मंगलकार्याची नांदी होईल. संततीच्या उत्कर्षांची वार्ता कानी येईल. संततीच्या शैक्षणिक प्रगतीस अनुकूल ग्रहमान आहे. कुटुंबात धार्मिक कार्याचे आयोजन केले जाईल. बड्या व्यक्तींचे घराला पाय लागतील संतसज्जनांचा सहवास लाभेल. गृहउद्योग तसेच जोडधंद्यातून कामाचा व्याप वाढेल. नवीन कार्यारंभ करण्यात यश येईल. २२ तारखेला आपल्या सुखस्थानातून बुध-शुक्राची होणारी युति कौटुंबिक सौख्य देणारी राहील. सामाजिक पत उंचावेल अशी खरेदी केली जाईल. नोकरीत पदोन्नती होईल. मनाजोग्या ठिकाणी बदली होईल. नवीन व्यावसायिक करारांतून आर्थिक लाभ होतील. गृहसुशोभिकरणासाठी आकर्षक शोभेच्या वस्तूची महिला खरेदी करतील.

मीन

आपल्या धनस्थानातील गुरु आता पराक्रमस्थानात प्रवेश करीत आहे. परप्रांतात व्यावसायिक संबंध प्रस्थापित कराल कामानिमित्त प्रवास घडून येतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. १५ तारखेला शनि कन्या राशीत वक्री होऊ न प्रवेश करीत आहे तर १७ तारखेला गुरु वृषभ राशीत प्रवेश करीत आहे. षष्ठस्थानी सिंहराशीत मंगळ आहे. त्यामुळे शनि-मंगळाचा काहीसा त्रास जाणवेल. प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतील. जूने आजार डोके वर काढतील. उष्णतेचे विकार, नेत्रविकार यांचा त्रास जाणवेल. हितशत्रूंच्या कारवायांना मोठय़ा युक्तीवादाने सामोरे जावे लागेल. विरोधकांवर मात कराल. वरिष्ठांची मर्जी राखून काम करावे लागेल. भागीदारीत व्यवसाय करणार्‍यांना भागीदारीचे सहकार्य मिळणार नाही. प्रत्येक कामात स्वत लक्ष घालण्याची गरज आहे. आपल्या राशितील हर्षलचा शनिशी प्रतियोग होत आहे. त्यामुळे सांसारिक जीवनात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता राहते. जोडीदाराशी वादंग उद्भवणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या. कोणतेही निर्णय लादू नका. भावंडांसंबंधी सुवार्ता कानी येईल. जवळचे प्रवास सुखाचे होतील व त्यातून कार्यसिद्धी होईल. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक संधी चालून येतील. संशोधनपर अभ्यासक्रमातून यश दाखविता येईल.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही